प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ एका मुलीवर प्रेम आहे तीच पण माझ्यावर खुप प्रेम आहे. पण ती विवाहित आहे. आमच प्रेम तिच्या विवावाहानंतर चालू झाल. मी अविवाहित आहे. मी तीच माघच सर्व विसरून तिला स्विकरायला तयार आहे. तिपन आजपर्यंत विवाहाला तयार होती पण आशात तीच म्हनन अस आहे की तीच तिच्या नवर्यला कलाल तर तो काहीतरी करुण घेइल. आपण फ़क्त बाहेरून संबंध ठेऊ. पण माझ खर प्रेम आहे . मला ही गोष्ट पटत नाही मी कस करू???

माझ एका मुलीवर प्रेम आहे तीच पण माझ्यावर खुप प्रेम आहे. पण ती विवाहित आहे. आमच प्रेम तिच्या विवावाहानंतर चालू झाल. मी अविवाहित आहे. मी तीच माघच सर्व विसरून तिला स्विकरायला तयार आहे. तिपन आजपर्यंत विवाहाला तयार होती पण आशात तीच म्हनन अस आहे की तीच तिच्या नवर्यला कलाल तर तो काहीतरी करुण घेइल. आपण फ़क्त बाहेरून संबंध ठेऊ. पण माझ खर प्रेम आहे . मला ही गोष्ट पटत नाही मी कस करू???

1 उत्तर

चांगला प्रश्न आहे आणि तितकाच गुंतागुंतीचा. पण तुम्ही तो विचारला म्हणून तुमचे कौतुक. खरं तर तुम्हीच या प्रश्नाचे उत्तर अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकता कारण तुम्हला परिस्थितीची चांगली जाणीव आहे असं प्रश्नावरून दिसत आहे.

कोणी कोणाशी संबंध ठेवावे, कधी ठेवावे हा खरं तर त्या-त्या व्यक्तींचा प्रश्न असायला हवा. बाह्य दबावामुळे, अनिच्छेने किंवा जबरदस्तीने लादले गेलेले आणि जिथे निव्वळ कोरडेपणा आहे असे नातेसंबंध प्रेयस आणि श्रेयस दोन्ही नसतात. त्यामुळे अशा नात्यात अडकून पडायचे की वेगळ्या वाटेने पुढे जायचे ते ठरवणे उपयुक्त ठरेल. पण असे निर्णय त्याच लोकांनी घेणे जरुरीचे आहे आणि सोबत त्याची जबाबदारीसुद्धा.

अशा निर्णयामुळे कोणावर अन्याय तर होणार नाही ना याची जबाबदारीही घेणं आपलंच काम आहे असं मला वैयक्तिकपणे वाटतं. तुमच्या मैत्रिणीला तिच्या या जबादारीची जाणीव आहे. पण तुम्हीही तिला हवे आहात. हे आज नाही पण पुढे तिच्या नवऱ्याला कळू शकतं आणि ती स्वतः गंभीर संकटात सापडू शकते.

तुमची स्थिती अवघड आहे. मला वाटतं ह्या वाटेने अधिक पुढे जाण्या अगोदर थोडं थांबणं तुमच्यासाठी आणि तिच्यासाठीही योग्य ठरेल. त्यानिमित्ताने तिला निर्णय घेण्यास थोडी उसंत मिळेल. तुम्ही तिला निर्णय घेण्यास मदत करा, दबाव मात्र आणू नका असा माझा सल्ला असेल. हीच वेळ आहे निर्णय घेण्याची असं मला वाटतं. तुम्हला शुभेच्छा…

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 11 =