तुमच्या दोघांच्या वयाचा विचार करता, तुम्ही स्वतः रजोविरामाच्या/मेनोपॉज(पाळी जाणे) कालखंडातून जात आहात. याकाळात लैंगिक इच्छा होणं म्हणजे काहीतरी ‘चूक’ आहे असं वाटू शकतं. पण असं वाटणं चूक नाही. ‘त्यात काय एवढे, असे वाटू शकतं’ हे नक्की. या काळात लैंगिक संबंध किंवा समागम करण्याची इच्छा होऊ शकते जी खूप नैसर्गिक आहे. समागम हा सहजीवनाचा एक अंग/ भाग आहे. या काळात लैंगिक ओढ वाटू शकते.
आपल्याला निर्माण झालेली भावना जोडीदाराला होते की नाही किंवा मी बोलल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय असेल अशी शंका आपल्या मनात येऊ शकते. तुम्ही लिहिल्याप्रमाणे मागील पाच ते सहा वर्षापासून तुम्हा दोघांमध्ये लैंगिक संबंध नाहीत. यामुळं तुम्हा दोघांना विशेषतः जोडीदाराला लैंगिक संबंध ठेवण्यास अडचण येईल का? किंवा त्याला काय वाटेल? असं वाटणं साहजिकच आहे. तुमच्या जोडीदाराच्या वयाचा विचार करता, या वयात पुरुषाच्या लिंगामधील ताठरपणा काहीसा कमी होवू शकतो किंवा वीर्यपतन लवकर/झटकन होऊ शकतं. मात्र लैंगिक भावना निश्चितच कमी झालेली नसते. यामुळे कोणताही न्यूनगंड आणि संकोच न बाळगता तुमच्या जोडीदाराशी बोला. जोडीदाराशी संवाद वाढवण्यामध्ये पुढाकार घ्या.
प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/lets-soch-ek-naya-nazaria/