माहिती asked 8 years ago

सुंता करणे आवश्यक असते का आणि शिघ्रपातानाशी त्याचा काही संभंध आहे का आणि जर सुंता करायचा असेल तर कोणत्या डॉक्टर कडे त्रेअत्मेंत घेणे आवश्यक असते आणि त्याचा खर्च किती असतो

1 उत्तर
Answer for माहिती answered 7 years ago

१. अनेकवेळा लैंगिक संबंधांच्या सुरुवातीच्या काळामध्ये लिंगावरची त्वचा मागे जाताना थोडाफार त्रास होऊ शकतो. परंतु हळूहळू हा त्रास कमी होत जातो आणि लिंगावरची त्वचा मागे जायला सुरुवात होते. त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. हस्तमैथुन करताना किंवा संभोग करताना लिंगावरची त्वचा मागे न जाता त्रास होत असेल तर सुंता करणं आवश्यक असतं. सुंता करणे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/male-circumcision/

२. शीघ्रपतन होण्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात, त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा. https://letstalksexuality.com/premature-ejaculation आणि https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

३. ही शस्त्रक्रिया करायची असल्यास एखाद्या सर्जन डॉक्टरांकडे जावे लागेल. तुम्हाला सुंता करण्याची आवश्यकता आहे की नाही हे तपासून घ्या. डॉक्टरांनी तसं निदान केलं तर एक छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. हे केल्याने लैंगिक सुखास बाधा येत नाही.

४. या शस्त्रक्रियेसाठी किती खर्च येतो हे तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 9 =