प्रश्नोत्तरेमुलगीला सेक्स केल्यावर चक्कर येते

1 उत्तर

खरंतर सेक्स आणि चक्कर येणं याचा तसा काही प्रत्यक्ष संबंध नाही त्यामुळे चक्कर येण्याची कारणं शोधावीत. सगळ्यात पहिल्यांदा काही शारीरिक कारण जसं की, अशक्तपणा, रक्तपांढरी (अॅनिमिया) आहे का ते शोधणे. त्याचबरोबर खालील काही मुद्द्यांचा देखील विचार करावा.

१. समोरच्या व्यक्तीची सेक्स करण्याची इच्छा, संमती आहे का? इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध होत असतील तर मनो- कायिक संबंध असल्याने चक्कर येऊ शकते.

२. सेक्सविषयीची भीती: आपल्या समाजामध्ये सेक्सविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही त्यामुळे अनेक गैरसमज पसरतात. त्यातीलच हा एक. चुकीची माहिती मिळाल्याने, ‘सेक्स म्हणजे वेदना’ असे समीकरण अनेक मुलींच्या मनामध्ये तयार होते. सेक्सविषयी मनात असलेली भीती, संकोच आणि लाज यामुळे मुली संभोगावेळी पाय आखडून घेतात, भीतीपोटी योनीचे स्नायू आकुंचित झालेले असतात. पहिला संभोग म्हणजे ‘आनंदाची परिसीमा’ असेही नसते किंवा ‘पहिला संभोग म्हणजे वेदना’ असेही नसते. जोडीदारांना आपापल्या आणि एकमेकांच्या शरीराविषयी माहिती असेल तसेच दोन्ही जोडीदारांनी एकमेकांना प्रेमाने आणि स्पर्शाने उत्तेजित केले तर पहिल्या संभोगात अजिबात वेदना होत नाहीत.

३. सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आवश्यक आहे. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते. आणि पहिल्यांदा सेक्स करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला जमायलाच पाहिजेत असा आग्रह धरू नका. तुम्हाला आनंद मिळणं आणि छान वाटणं जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीचे काही ‘इरॉटिक पॉइंटस’ असतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला शरीराच्या विशिष्ट भागाला स्पर्श केल्याने लैंगिक सुख मिळत असतं. अशा शरीराच्या अवयवांना स्पर्श केला पाहिजे. याला प्रणय किंवा फोअरप्ले म्हणतात. किमान पहिली २० मिनिटं फोरप्ले करावा. तसेच ‘फोरप्ले’ मध्ये शिस्निकेला (मूत्रमार्गाच्या वरचा भाग) स्पर्श केल्याने स्त्रीला उत्तेजित होण्यास मदत होते.

४. योनीमध्ये तयार होणारा ओलावा/ योनिस्राव: लैंगिक संबंधाच्या वेळेस योनीमध्ये ओलसरपणा वाढतो म्हणजे नक्की काय होते, हे समजून घेऊयात. स्त्रिला लैंगिक इच्छा झाली आणि लैंगिक उत्तेजना मिळाली की, योनीमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि योनीच्या आतील स्राव वाढून योनीतील ओलावा वाढतो. स्त्रीच्या मनात सेक्स करण्याची इच्छा नसेल किंवा उत्तेजना मिळाली नसेल तर योनीमध्ये ओलसरपणा तयार होणार नाही. म्हणूनच लैंगिक संबध करत असताना संमती आणि इच्छा खूप महत्वाची आहे.योनीमध्ये तयार होणारा ओलावा/ योनिस्राव संबंधांच्या वेळी वंगण(लुब्रींकंट) म्हणून काम करत असतो. तो कमी झाल्याने शरीरसंबंध करताना योनीमध्ये आग होऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो. प्रत्यक्ष संभोगापूर्वी कामक्रीडा (फोरप्ले) करणं योनीमध्ये ओलावा तयार होण्यामध्ये फायदेशीर ठरतं. योनीतील ओलसरपणा वाढविण्यासाठी काहीजण कृत्रिम वंगण(लुब्रींकंट)/जेली चा वापर करतात. तुमच्या जोडीदाराशी याविषयी बोला.

वरील सर्व मुद्द्यावर काम करून देखील चक्कर येत असेल तर एखाद्या डॉक्टरांचा किंवा सायकोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 18 =