प्रश्नोत्तरेCategory: Private Questionयोनी फाडली नसेल तर वीर्य योनीत जात का ? गरोदरपणा येऊ शकतो का ?

2 उत्तर

योनीमध्ये एक पातळ पडदा असतो त्याला योनीपटल (हायमेन) म्हणतात. किशोर वयात किंवा पुढे ही तो कधीकधी धावणे, पोहणे, सायकल चालवणे या क्रियांमुळे फाटू शकतो. तो पहिल्या संबंधांच्या वेळेसच फाटायला हवा अशी काही आवश्यकता नाही. लिंग योनीत प्रवेश करून झालेल्या लैंगिक संबंधात वीर्य स्त्री बीजाच्या शोधात पुढे जातेच आणि गर्भधारणा होण्याचा संभव असतोच.

एक विचार तुमच्यासाठी.. आपण म्हणणे मांडत असताना, व्यक्त होत असताना कोणते शब्द वापरतो, भाषेचा उपयोग करतो याचा विचार होणे गरजेचे नाही का? योनी फाडणे, सील तोडणे हे शब्द मानवी वाटत नाहीत. बघा..

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 20 =