प्रश्नोत्तरेयोनी वर ताण पडल्याने रक्त आले आणि ते लिंगाला लागले तर काही धोका आहे का ?

एकाच व्यक्ति सोबत सेक्स करताना त्या व्यक्तीच्या योनी वर तान पडल्याने रक्त आले आणि ते लिंगाला लागले तर काही धोका आहे का ?
एकाच व्यक्ति सोबत सेक्स करताना निरोध चा वापर नाही केला तर काय होईल?

 

1 उत्तर

जोडीदाराला लिंग सांसर्गिक आजार झाले नसतील तर लिंगाला रक्त लागलं तर काही धोका नाही. कदाचित पहिल्यांदा सेक्स करताना योनीपटलावराचा पडदा फाटू शकतो आणि त्यातून रक्त देखील येवू शकतं. परंतू हे सगळ्याच मुलींबाबत घडेल असं अजिबात नाही. जर संभोग करताना नेहमी रक्त येत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या. संभोग करताना असं नेहमी रक्त येत नाही. जर तुमच्या जोडीदाराला यातून त्रास होत असेल तर संभोग करताना योनीवर ताण येईल अशा पोजिशन टाळा.  आता तुमच्या  दुसऱ्या प्रश्नाबद्दल बोलू या. निरोधचा  वापर कशासाठी होतो हे माहित असणं आवश्यक आहे. निरोधचा वापर नको असणारी गर्भधारणा टाळणं, लैंगिक आजारांपासून संरक्षण आणि एचआयव्ही/ एड्सपासून बचाव करणं आहे. एकाच व्यक्ति सोबत सेक्स करताना निरोधचा वापर नाही केला तर कदाचित नको असणारी गर्भधारणा होवू शकते किंवा लिंगसांसर्गिक आजारांचा धोका देखील वाढतो. त्यामुळं निरोध वापरणं जास्त फायदेशीर राहतं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 16 =