प्रश्नोत्तरेयोनी स्त्राव शी संपर्क आल्यास ( योनीत बोटे घातली ) किंवा वीर्य जर त्वचा वर पडल्याने एच आय व्ही होतो का ? सर मला असे विचारायचे आहे कि पार्टनर सोबत सेक्स करताना निरोध वापरला पण अगोदर तिच्या योनीत बोटे घातली आणि वीर्य तिच्या हातावर , अंगावर पडले तर एच आय व्ही लागण होते का ?

1 उत्तर

योनिस्राव किंवा वीर्य यांचा त्वेचेशी संपर्क आला तर एच. आय. व्ही. होत नाही. समोरच्या व्यक्तीला एच.आय.व्ही असेल तर लैंगिक संबंधांतून हा आजार पसरतो. एच.आय.व्ही. -एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपल्या वेबसाईटवर एच. आय. व्ही./ एड्स विषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ती ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

Pratik replied 2 years ago

सेक्स केल्यानंतर कंडोम हाताने काढल्यावर ‌एच‌आयवी होतो का

let's talk sexuality replied 2 years ago

एखाद्या व्यक्तीला एच. आय. व्ही. असेल तरच त्या व्यक्तीकडून एच.आय.व्ही. ची लागण होऊ शकते. शिवाय एच.आय.व्ही. पसरण्यासाठी एच.आय.व्ही. असलेल्या लैंगिक स्त्रावांचा दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश होणे जरुरीचे असते. त्यामुळे हातावरील त्वचेला जखम किंवा ओरखडे नसतील तर हातावर वीर्य पडल्याने किंवा हाताला लैंगिक स्त्राव लागल्याने एच.आय.व्ही. शरीरात शिरणार नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 17 =