प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsबाळाचे लिंग कितव्या महिन्यात समजते?

1 उत्तर
Answer for लिंग answered 6 years ago

तुम्हाला याचे उत्तर का हवे आहे, याबददल तुम्ही लिहिले नाही. फक्त उत्सुकता म्हणुन तुम्हाला माहिती हवी असावी असे आम्ही गृहित धरत आहोत.

गर्भधारणा झाल्यानंतर बाळाच्या लिंगाची घडण 6 व्या आठवड्यातच सुरु होते. गर्भधारणेपासून 18 व्या आठवड्यापासून बाळाची तपासणी करताना अल्ट्रासाऊंड मशीनने बाळाचे लिंग डॉक्टर पाहू शकतात. पण लिंग काय आहे हे सांगण्यास त्यांना कायद्याने मनाई आहे, हा गुन्हा आहे.

याकरिता गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायदा भारतात आहे. या कायद्याच्या अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा. https://letstalksexuality.com/pcpndt/

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 2 =