लिंगाची लिंगाची जाडी, लांबी आणि आकार किती असावा यासाठी काही विशेष मापदंड नाही. प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. शात्रीयदृष्ट्या सागायचे तर लिंग योनीत जाऊन त्यात शुक्राणू पोहचवण्याइतपत पुरेसे लांब असावे. लिंगाची जाडी, लांबी आणि आकार यात व्यक्ती परत्वे फरक असतो. सर्वसाधारणपणे उत्तेजित/ ताठरता आलेल्या लिंगाची लांबी ३- ५ इंच असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. यात काही अडचण येत नसेल तर निश्चिंत रहा. काळजी करण्याचे काहीही कारण नाही. लिंगाचा आकार/साईझ वाढवण्याचा कोणताही शास्त्रीय उपाय नाही. लिंगाच्या लांबीविषयी चर्चिले गेलेले वेबसाईटवरील इतर प्रश्नोत्तरे नक्की वाचा.
Ling Mothe karayche aslyas kay karave.?