प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलैंगिक आरोग्य

नमस्कार सर, मी आपल्या वेबसाईटचा नियमित वाचक आहे. आपण महत्वपूर्ण माहिती पोचत आहात. त्याबद्दल धन्यवाद… मला अस विचारायचं आहे की, माझ्या लिंगाच्या आजुबाजुला व वृषणावर मोठ्या प्रमाणावर केस येतात. मी नियमितपणे ते कात्री ने कापतो परंतु दोन आठवड्यांपूर्वी मी केस कापले तर तिथे मोठ्या प्रमाणावर खाज सुटत आहे. Infection किंवा Rasehes अस काही नाही तरीही खाज सुटत आहे. मला तेथील केस पुर्ण काढायचे आहेपण मला कायमस्वरूपी केस काढायचे नाहीत. मला घरीच ते केस काढता येईल का? मी तिथे ब्लेड किंवा लेजर चा एकदाही वापर केला नाही. बाहेर सलून मध्ये केस काढून देतात का?… कृपया मार्गदर्शन करावे

1 उत्तर

लैंगिक अवयवांच्या आजूबाजूचे केस लैंगिक अवयवांचं रक्षण करत असतात, पण लैंगिक अवयवांची स्वच्छता राखणंही जरुरीचं आहे. त्यामुळे गरजेनुसार केस कापणे उत्तम.
कात्रीने केस कापल्यावर कापलेले छोटे केस टोचत राहिल्याने कधी कधी थोडी खाज येऊ शकते. पण खाजेचे कारण कळत नाही पण खूप त्रास होत असेल तर डॉक्टरांना भेटणे कधीही उत्तम.
तुम्हाला पूर्ण केस काढायचे असल्यास रेझरचा वापर करु शकता. काहीजण क्रीमचा वापर करतात. हर्बल किंवा इतर कोणत्याही क्रीममध्ये काही रसायनं असतात ज्याचा लैंगिक अवयवांच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यातून खाज आणि आग होऊ शकते. त्यामुळे लैंगिक अवयवाच्या आजूबाजूला हे क्रीम वापरण्याआधी तुम्हाला ते सूट होते का हे बघण्यासाठी हातावर किंवा पायावर ते वापरून बघावे.
तुमच्या परिसरातमध्ये असे केस काढतात की नाही, हे ओळखीच्या सलुन मध्ये तुम्ही विचारणा करुन पाहू शकता.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 0 =