प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsवृषणाच्या किंवा बिजकोषाच्या आकारावरुन शुक्राणु कमी जास्त तयार होतात का?

1 उत्तर

नाही. वृषणाच्या किंवा बीजकोषाच्या आकारावरुन शुक्राणूंच्या निर्मितीवर काहीही परिणाम होत नाही. शरीराचं तापमान आणि वृषणांचं तापमान यामध्ये फरक असतो. वृषणांमध्ये शुक्राणूंची निर्मिती होण्यासाठी ठराविक तापमानाची गरज असते. शरीराच्या रचनेमध्ये वृषणांची पिशवी शरीराबाहेर असते ज्यामुळं वृषणांची पिशवी आंकुचन आणि प्रसरण पावून तापमान राखता येतं. जर ठराविक तापमान निर्मितीसाठी वृषणांना अडथळा निर्माण होत असेल तर तर शुक्राणूंच्या कमी-जास्त निर्मितीवर परिणाम होवू शकतो. उदा. जास्त तंग किंवा उष्ण प्रदेशात जाडसर कपडे घालणं. जर लिंगाला संभोगादरम्यान ताठरता येत असेल आणि वीर्यामध्ये पुरेसे शुक्राणू असतील तर अंडकोष किंवा वृषण  लहान असल्याने काहीही अडचण येत नाही. सेक्स किंवा संभोग करताना जर लिंगाला ताठरता येत असेल तर संभोग करताना अथवा लैंगिक सुखामध्ये बाधा येत नाही आणि तुमच्या वीर्यामध्ये सशक्त शुक्राणू असतील तर गर्भाधारनेस अडचण येत नाही. यामध्ये जर काही अडचण येत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा काळजी करण्याचे काहीही कारण नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 16 =