प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsशिशनमुण्डावर उन्हाळ्यात बारीक़ पिम्पल्स येतात , का येतात व् उपाय सुचवा……
1 उत्तर

असं जर फक्त उन्हाळ्यात होत असेल तर ते बुरशीसारख्या जंतुलागणीमुळे होऊ शकतं. उन्हाळ्यामध्ये घाम आणि उष्णतेमुळे जंतूंची वाढ जास्त वेगाने होते. त्यामुळे कधी कधी शिश्नाच्या त्वचेवर बारीक मुरुम, पुटकुळ्या येऊ शकतात. यासाठी उन्हाळ्यात आणि एरवीही लैंगिक अवयवांची स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं. आतले कपडे जास्त घट्ट किंवा सिन्थेटिक कापडाचे नसावेत. त्याचप्रमाणे ते स्वच्छ आणि वेळच्या वेळी धुतलेले असावेत.
कधी कधी जननेंद्रियांवरच्या नागिणीमध्येही असं पुरळ येतं. त्यासाठी त्वचाविकारांच्या डॉक्टरांना भेटणं योग्य ठरेल.
तुम्ही पुढील ठिकाणी जास्त माहिती घेऊ शकता. 
प्रयास, अमृता क्लिनिक, आठवले कॉर्नर, कर्वे रोड, डेक्कन जिमखाना – 411004
फोन – 91-20-25441230/65615726
फॅकस +91+20-25420337
ईमेल – health@prayaspune.org
वेबसाइट – prayaspune.org/health
तुमच्या मनात इतर काही शंका असतील तर त्या तुम्हाला इथे विचारता येतील.
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 7 =