प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसातव्या महिन्यात सेक्स करतात का

1 उत्तर

काही विशिष्ट समस्या नसेल तर गरोदरपणात शरीर संबंधावर खरं तर काही निर्बंध असण्याची आवश्यकता नाही. वास्तवात गर्भ धारणा झाली आहे हे बहुतेक वेळेस दुसऱ्या महिन्यात लक्षात येते. त्यामुळे गरोदरपणाच्या अगदी प्राथमिक टप्प्यात शरीर संबंध आलेले असण्याची श्यक्यता असतेच. पूर्वी जर एकापेक्षा अधिक गर्भपात झाले असतील किंवा तशी काही हिस्ट्री असेल तर डॉक्टर बरेचदा पहिल्या काही महिन्यात शरीर संबंध टाळण्याचा सल्ला देतात. नंतरच्या काळात म्हणजे गरोदरपणाच्या तिसऱ्या टप्प्यात किंवा तिसऱ्या तिमाहित पोटाचा वाढलेला घेर कदाचित अडथळा ठरू शकतो किंवा ओटीपोटावर जोर किंवा दाब पडण्याची शक्यता असते. या परिस्थितीत अन्य एखाद्या पोझिशनचा विचार करता येईल उदा. शरीर संबंधांच्या वेळी स्त्री जोडीदार वरती असेल. गरोदरपणात गर्भाशयाचे तोंड उघडणे किंवा रक्तस्त्राव (स्पॉटिंग) होणे गंभीर असते. अशी शक्यता वाटत असेल तर तुम्हाला शरीर संबंध टाळण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. जर जोडीदाराला लिंग संसर्ग झालेला असेल तर तो पूर्ण बरा होइपर्यंत संबंध न येऊ देणं गरजेचंच आहे. ह्या आणि अशा काही परिस्थिती सोडल्या तर शरीर संबंधांवर इतर कुठलीही बंधनं आणण्याची गरज नाही. शरीर संबंधांचा गर्भावर कसलाही परिणाम होत नाही. गरोदरपणात शरीर संबंध टाळा असा सल्ला प्रत्येकाला देणं खरंतर तर अयोग्य आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 5 =