प्रश्नोत्तरेCategory: Private Questionसेक्स करताना योनी मध्ये लिंग जात नसेल तर काय करावं

2 उत्तर

काहीवेळा मुलींच्या मनामध्ये सेक्सविषयी भीती असते त्यामुळे संबंधादरम्यान पाय आखडून घेतले किंवा भीतीपोटी योनीचे स्नायू आकुंचित झाले असतील तर सेक्स करताना योनी मध्ये लिंग जाण्यास अडथळा येऊ शकतो.

यासाठी जोडीदाराशी मनमोकळा संवाद गरजेचा आहे. जर जोडीदाराच्या मनात अशी काही भीती आहे असे आढळल्यास संवादातून ती दूर करता येईल.

तसेच संभोग करताना लिंग आणि योनीमध्ये वंगण(लुब्रींकंट) असणं महत्वाचं आहे. प्रत्यक्ष संभोगापूर्वी कामक्रिडा(फोरप्ले) करणं वंगंण येण्यास फायदेशीर राहतं. जर असं वंगंण नैसर्गिकरित्या येण्यास अडचण येत असेल तर कृत्रिम वंगंणाचा वापर करता येवू शकतो. अशी कृत्रिम वंगंण डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावीत. तुमच्या जोडीदाराशी याविषयी बोला. जोडीदाराला अशा संभोगातून काही इजा किंवा त्रास होत आहे की नाही हे विचारा.

आपल्या वेबसाईटवर फोर प्ले विषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक दिली आहे.

https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 10 =