प्रश्नोत्तरेसेक्स करूनही मूल होत नाही

1 उत्तर

सेक्स केला म्हणजे गर्भधारणा होतेच असे नाही. तुम्ही सेक्स पाळी चक्राच्या कोणत्या काळात करता यावर गर्भधारणा होणार की नाही, हे अवलंबून असते.

पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ या लिंक वरील लेख वाचा. बऱ्याचदा आपल्या समाजात मुल होत नसेल तर स्त्रीलाच जबाबदार धरले जाते मात्र हे चुकीचे आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की गर्भधारणेसाठी स्त्री आणि पुरुष या दोघांचाही संबंध असतो. त्यामुळे दोघांसाठीही वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे. गर्भधारणेसाठी पूरक असणाऱ्या काळात संभोग केल्यानेदेखील गर्भधारणा होत नसेल तर अवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 9 =