प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसेक्स केल्यावर प्रेग्नन्ट राहू नये म्हणून काय करावे
1 उत्तर

या प्रश्नांचं उत्तर अनेकवेळा वेबसाईटवर दिलेलं आहे. इथे पुन्हा देत आहोत. संभोग करणं ही एक जबाबदार लैंगिक कृती आहे. योग्य त्या गर्भनिरोधन साधनांचा वापर केला नाही तर गर्भधारणेची शक्यता नेहमीच राहते. कंडोम सारख्या गर्भनिरोधन साधनांचा वापर संभोगादरम्यान केला जास्त फायदेशीर राहतो. कारण इतर साधनांच्या तुलनेत स्वस्त, विश्वासू आणि शरीराला जास्त हानीकारक ठरत नाहीत.

संभोगानंतर वापरण्याची गर्भनिरोधन साधनं शरीराला हानीकारक ठरू शकतात. शिवाय मानसिक आरोग्याचा प्रश्न बाजूला सारता येत नाही. संभोगानंतर वापरण्याची साधन शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. जोडीदाराला काही अ‍ॅलर्जी किंवा इतर औषधं चालू असल्यास डॉक्टर योग्य मार्गदर्शन करु शकतील.

गर्भनिरोधनांच्या माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/contraception/

धोकादायक गर्भनिरोधनांच्या माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hazardous-contraceptives/

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 1 =