प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsस्त्री च्या योनीतुन वारंवार वीर्यपतन का होते
1 उत्तर

सर्वात प्रथम हा गैरसमज दूर केला पाहिजे की पुरुषांचं जसं वीर्यपतन होत तसं स्त्रियांच होत नाही. योनीमधून येणारा पाढर्‍या रंगाचा स्त्राव हा वीर्य नसतो. योनी स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा त्याला कोणत्याही विषाणूंची लागण होवू नये म्हणून स्त्री शरीराची स्वतःची एक यंत्रणा काम करत असते. यामुळं विविध स्त्राव होत असतात. थोडाफार पांढरा स्त्राव होणं अगदी नॉर्मल आहे. परंतू काही मानसिक ताणामुळं या स्त्रावावर परिणाम होवू शकतात आणि त्याचं प्रमाण वाढू शकतं. योनी मार्गामध्ये जर काही रोगाची किंवा विषाणूंची लागण झाली असेल तर हा स्त्राव जास्त प्रमाणात होतो अशावेळेस लवकर डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 16 =