हस्तमैथुन करण्यामध्ये काहीही गैर नाही. हस्तमैथुन केल्यामुळे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. हस्तमैथुन ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. लिंगाला किंवा योनीला जखम होणार नाही याची काळजी हस्तमैथुन करताना घेतली पाहिजे. समाजामध्ये हस्तमैथुनाबद्दल अनेक गैर समज आहेत. त्यांना शास्त्रीय आधार नाही. खाली काही गैरसमज दिले आहेत.
१. हस्तमैथुनामुळं लिंग वाकडं होतं
२. हस्तमैथुनामुले वीर्य पातळ होतं
३. हस्तमैथुनामुळं बाळ होण्यास अडचण येते
४. हस्तमैथुनामुळं कमजोरी येते. हे सर्व गैर समज आहेत.
याउलट लैंगिक भावनांचा येणारा ताण हस्तमैथुनामुळं कमी करता येतो. मात्र सतत डोक्यामध्ये सेक्सबद्दल विचार येत असतील आणि त्यामुळं तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत असेल तर मात्र विचार करण्याची गरज आहे. त्याबद्दल अधिक माहितीसाठी समुपदेशकांची मदत घ्या.