मी 44 वर्षाची स्त्री आहे . मी विधवा आहे . माझ्या मैत्रिणीचा मुलगा माझ्या घरी एकदा राहायला आला होता त्याच वय 20 आहे. त्या दिवशी मी त्याचे झोपेत मुखमैथुन केले ? मला संभोग करायचा आहे काय करू ?
परवानगी आणि संमती शिवाय केलेली लैंगिक कृती हा कायद्याने गुन्हा आहे हे लक्षात घ्या. आणि सावध असा. अशी कुठल्याही कृतीचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तुमची स्थिती समजण्यासारखी आहे. पण त्यासाठी हा मार्ग चुकीचा आहे. लैंगिक आनंदासाठी आणि एकूणच आयुष्यात जोडीदाराची अवश्यकता वाटणं हे स्वाभाविक आहे. त्यात गैर काही नाही. पण त्यासाठी तुम्हाला योग्य जोडीदार शोधावा लागेल. परंतु तिथेही परत संमती, परवानगी या गोष्टी महत्त्वाच्याच आहेत.
विधवा स्त्रीला आजही आपल्या समाजात अनेक समस्यांचा, विषमतांचा सामना करावा लागतो. अनेक मुलभूत अधिकारांपासून त्यांना वंचित रहावं लागतं किंवा ठेवलं जातं. हे खरंच आहे. त्यामुळे यातून बहरे पडून स्वतःसाठी वेगळ जग निर्माण कारणं अवघड असतं. तुम्हाला ते तसं करायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील.
लैंगिक आनंदासाठी प्रत्येक वेळी जोडीदाराची आवश्यकता नसते. स्वतःच स्वतःला आनंद देण्याच्या अनेक पद्धती आहेत. हस्तमैथुन त्यातील एक. सर्वात सुरक्षित आणि इतर कुठलीही भीती किंवा धोके त्यात नसतात. लैंगिक खेळणी (भारतात त्यांना बंदी आहे), चित्र किंवा चित्रफिती यांचा उपयोग करता येऊ शकेल. तेंव्हा संमती शिवायच्या कुठल्याही कृतीपासून दूर राहा आणि सावध असा.