प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsआमचं घर बारीक आहे एक रुम आहे फक्त त्याच्यातच स्वयंपाकाच पण आहे आम्ही घरात आई वडील बहिण छोटा भाऊ चुलता एकाच रुम मध्ये झोपतो माझं लग्न एक महिन्या नंतर आहे तर आम्ही सेक्स कसा करु सेक्स करताना आवाज येतो का म्हणजे सेक्स करताना बायको ओरडते का
1 उत्तर

तुम्ही सांगितलेल्या परिस्थितीला अनेक जोडप्यांना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत प्रत्येक जोडपं आपला स्वतःचा मार्ग शोधत असतं. अगदी सारखीच परिस्थिती असलेल्या एका जोडप्याने सांगितलेल्या अनुभवानुसार, त्यांनी पलंगाला एक जाडसर पडदा लावून घेतला आणि रात्री संभोगाच्यावेळी थोडी मोठ्या आवाजात गाणी किंवा टिव्ही लावणं त्यांना सोईचं होतं. दुसर्‍या एका जोडप्याच्या अनुभवानुसार त्यांनी खाटेखालील जागेचा पुरेपुर वापर केला. कदाचित तुम्हालादेखील अशीच एखादी भन्नाट कल्पना सुचेल. जास्तीचा सल्ला म्हणून, नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य त्या गर्भनिरोधकांचा वापर करा.

आता तुमच्या प्रश्नातील महत्वाच्या भागाकडं वळू या. संभोग करताना प्रत्येक स्त्रीला त्रास होईलच असं अजिबात नाही. संभोग करताना तो सुखकर होण्यासाठी पुरेसं वंगण योनी आणि लिंगामध्ये तयार होणं आवश्यक असतं. यासाठी प्रत्यक्ष संभोगापूर्वी फोरप्ले म्हणजे एकमेकांना लैंगिक उत्तेजना देण्यासाठी लैंगिक कृती(चुंबन देणे, आलिंगन देणे किंवा लैंगिक अवयवांना कुरवाळणं अशा कृती) करणं. अशा लैंगिक कृतींमुळं पुरेसं वंगण तयार होतं आणि स्त्री-पुरुष दोघांनाही संभोग करणं सुखकारक होतं. जर तुम्हाला असं वाटत असेल की संभोग करताना काही आवाज टाळणं अशक्य आहे तर तुम्हाला एखादी भन्नाट कल्पना सुचली तर ती नक्की ट्राय करा. जोडीदाराशी याविषयी बोला. कदाचित जोडीदाराकडेही यावर काही भन्नाट कल्पना असेल.

तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा..!

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 18 =