उपयोग होत नाही. तुमचे पैसे जातील एवढी मात्र खात्री आहे. गोळ्या किंवा क्रीम्स यांचा लिंगाच्या साईजवर तर काही फरक पडत नाही पण तुमच्या शरीरावर यांचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सावध असा. लैंगिक आनंद आणि लिंगाचा आकार यांचा सहसा फारसा संबंध नसतो.
पॉर्न क्लिप्समध्ये पाहून किंवा असे साहित्य वाचून कुणाला असे वाटू शकते की लिंगाचा आकार लहान आहे. हे नेहमी लक्षात ठेवा, पॉर्न क्लिप्स किंवा अशास्त्रीय पुस्तकांमध्ये अनेकदा चुकीची माहिती दिली जाते. त्यामध्ये संभोगाविषयी अनेक अतिरंजित कल्पना असतात. अन याच कल्पनांना खतपाणी घालून आपला धंधा चालवणे हे एक मोठे मार्केट आहे. अन जर संभोग करण्यामध्ये लिंगाच्या आकारामुळे मुळे अडचणी येत असतील तर उपचार आणि औषधांसाठी प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा काळजी करण्याचं कारण नाही. लिंगाच्या आकाराच्या बाबतीत अधिक माहितीसाठी पुढील लिंक नक्की पाहा.
https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/