प्रश्नोत्तरेएकच लिंग एकाच वेळी दोन स्त्रियांनी तोँडात घेउन चोकले तर एडस चा काही धोका आहे का

1 उत्तर

शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो. लिंगसार्गिक आजार असतील तर एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो.

एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते.

एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे

निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया,

दूषित रक्त आणि

प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.

तोंडाच्या जर काही जखम झाली असेल आणि त्यातून रक्त येत असेल अशावेळी केलेल्या मुखमैथुनामधून एचआयव्हीची लागण होवू शकते. जर तिघांपैकी कोणालाही एचआयव्हीची लागण झालेली नसेल तर काहीही धोका नाही. परंतू नेहमी सुरक्षित लैंगिक संबंध फायदेशीर राहतात.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 13 =