प्रश्नोत्तरेएका मुलीसोबत दोघांनी एकावेळी संबंध ठेवले तर एड्स होतो का? तिघांना HIV नाही

1 उत्तर

एच. आय. व्ही. होण्याचा संबंध कितीजणांशी सेक्स करतो किंवा कितीवेळा करतो याच्याही नसून असुरक्षित लैंगिक संबंधांशी आहे. ज्या व्यक्तीला एच.आय.व्ही/ एड्स ची लागण झाली आहे अशा एकाजरी व्यक्तीबरोबर असुरक्षित लैंगिक संबंध आला तर एच. आय. व्ही./ एड्स होण्याचा धोका वाढतो किंवा होऊ शकतो. ज्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध आले आहेत त्या व्यक्तीला एड्स नसेल अशा व्यक्तीसोबत कंडोम न वापरता लैंगिक संबंध आले तर एच. आय. व्ही होत नाही. मात्र एच. आय. व्ही./ एड्स आहे की नाही हे ओळखण्याचा एच. आय. व्ही. टेस्ट हाच एकमेव खात्रीशीर मार्ग आहे. लक्षणांवरून एच. आय. व्ही. आहे की नाही हे ओळखणे हा खात्रीशीर मार्ग नाही. व्यक्ती एच.आय.व्ही/ एड्स बाधित असो किंवा नसो सुरक्षित लैंगिक संबंध महत्वाचे आहेत.

एच. आय. व्ही./ एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 18 =