माझ्या gf ला दिवस गेलेत पण तिच्या लक्षात नाही नेमके किती दिवस झालेत. काय कराव आणि किती महिन्या पर्यन्त गर्गभपात करता येतो
भारतामध्ये 20 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात कायदेशीर आहे. आईच्या जिवास धोका असल्यास, गर्भामध्ये गंभीर व्यंग असल्यास, बलात्कारातून गर्भ राहिला असल्यास किंवा गर्भनिरोधक निकामी ठरल्याने गर्भ राहिला असल्यास गर्भपात करण्यास परवानगी आहे. पहिल्या 12 आठवड्यात म्हणजेच गर्भधारणा झाल्यापासून पहिले तीन महिने गर्भपात सुरक्षित असतो. त्यामुळे गर्भपात करायचा असल्यात तसा निर्णय लवकर घेणं आणि शक्यतो पहिल्या तीन महिन्यात गर्भपात करून घेणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. 12 आठवडे उलटून गेले असतील तर दोन डॉक्टरांच्या संमतीने गर्भपात करून घेता येतो. गर्भपात नोंदणीकृत दवाखान्यामध्येच करून घ्या. गर्भपात करणारी डॉक्टर प्रशिक्षित आहे का याची माहिती करून घ्या. जिथे गर्भपात करणार तो दवाखाना, जागा साफ व निर्जंतुक आहे ना याची खात्री करणं आवश्यक आहे. 20 आठवड्यांनंतर गर्भपात कायदेशीर नाही. त्यामुळे जास्त वेळ न दवडता गर्भपाताचा निर्णय शक्यतो लवकर घ्या.
गर्भपाताविषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर भेट द्या.