प्रश्नोत्तरेनवरा दिवसातुन आठ,दहा वेळा सेक्स करतो काही अपाय होईल का?

1 उत्तर

तुमची याला संमती आहे का? तुमची संमती असेल आणि तुम्हाला देखील आनंद मिळत असेल तर काहीच अपाय होणार नाही. पण तुम्हाला आवडत नसेल, इच्छा नसेल तर तसं जोडीदाराला आवर्जून सांगा.

खरंतर कोणी कितीवेळा सेक्स करावा ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे. तुमच्या दोघांच्याही डोक्यामध्ये सेक्स बद्दलच्या काय कल्पना आहेत त्या तपासून पाहा. सेक्स आयुष्यातील महत्वाचा भाग आहे तरीदेखील सतत सेक्स संबंधीचे विचार येणं योग्य नाही. केवळ सात, आठ, नऊ, दहा वेळा सेक्स असे आकडे वाढविण्यात काहीही अर्थ नाही. रोज कितीदा सेक्स केला यापेक्षा त्यातून मिळणारा आनंद याबद्दल विचार करणे योग्य ठरेल. केवळ स्कोर करण्याच्या दृष्टीतून सेक्सकडे बघण्यापेक्षा तुमच्या जोडीदाराची देखील तितकीच इच्छा आणि संमती आहे का? दोघांच्याही आनंदाचा विचार केला जातो का? हे बघणं जास्त महत्वाचं आहे.

एकमेकांशी बोलून दोघांनाही आवडतील, झेपतील असे लैंगिक सुखाचे मार्ग शोधा. लैंगिक संबंध आयुष्यात महत्वाचे आहेच पण सेक्सशिवाय इतर कशातूनच आनंद मिळत नाही अशी स्थिती मात्र येऊन देऊ नका.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 3 =