हो, अशी शक्यता असते असं म्हटलं जातं. लवकर मासिक पाळी सुरु झाल्याने मासिक पाळी चक्राच्या दरम्यान रक्तात स्रवणाऱ्या इस्ट्रोजन हॉर्मोन्सचा संबंधही शरीराशी अधिक काळ येतो आणि त्यामुळे स्तनांचा कँसर होण्याचा धोका वाढतो. ज्या स्त्रियांना १२ वर्ष वयाच्या आत मासिक पाळी येते त्यांच्यामध्ये स्तनांचा कँसर होण्याचा धोका ५ टक्क्यांनी वाढतो असं काही संशोधनांतून समोर आलं आहे. मात्र यासाठी मुलींनी नैसर्गिक पाळीचक्र बदलण्यासाठी किंवा पाळी उशिरा यावी यासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही. ज्यांना लवकर मासिक पाळी आली आहे त्यांना स्तनांचा कँसर होईलच असेही नाही. शिवाय स्तनांचा कँसर होण्याचे हे काही एकमेव कारण नाही. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. काही प्रतिबंधात्मक उपाय करून स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो. तसेच स्तनात एखादी गाठ नाही ना याची नियमितपणे स्वतःची स्वतः पाहणी केल्यास कर्क रोगाला प्राथमिक अवस्थेतच प्रतिबंध करता येतो.
स्तनांच्या कर्करोगाची इतर कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.