प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपॉर्न फिल्म पाहणे ही विकृती होऊ शकते का?

1 उत्तर

पॉर्न फिल्म पाहणे ही विकृती होऊ शकते का? हे समजुन घेण्यासाठी जरा सविस्तरपणे काही बाबी समजुन घेउयात.
पॉर्न पाहिलं तर मेंदूत नक्की काय होतं? पॉर्न पाहिल्यामुळे मेंदूत डोपामाइन नावाचं द्रव्य मोठ्या प्रमाणावर स्रवतं. यामुळे आपल्याला एक सुखकर संवेदना होते. खरं म्हणजे कुठलीही आवडणारी गोष्ट केली की मेंदूत हे द्रव्य स्रवतं. आपल्याला ती गोष्ट पुन्हा-पुन्हा करायची प्रेरणा त्यातून मिळते. पॉर्न पाहून डोपामाइन स्रवलं की आणखी पॉर्न पाहायची इच्छा निर्माण होते. पण त्यातून होतं असं, की तुम्ही जितकं जास्त पॉर्न पाहाल तितकी या द्रव्याला प्रतिसाद द्यायची तुमच्या मेंदूची क्षमता कमी होते. साहजिकच सुखाची तीच पातळी अनुभवायला जास्त डोपामाइनची गरज पडते. म्हणजे तेवढंच सुख मिळवायला जास्त पॉर्न पाहणं आलं. असा तिढा आहे. हे एक दुष्टचक्रच आहे. दारूच्या किंवा कोकेनसारख्या अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या माणसाच्या मेंदूत नेमकं हेच घडतं. म्हणून तर सुरुवातीला दोन पेगमध्ये ‘किक’ मिळणाऱ्याला नंतर ‘हाय’ होण्याकरता तीन पेग, पुढं चार पेग, असं करत करत शेवटी पाच-सहा पेग घ्यावे लागतात.
यालाच एखाद्या गोष्टीची चटक लागते असं म्हणतात. तशी पॉर्नचीही लागते. पण त्याला पॉर्नचं व्यसन लागतं म्हणता येईल का? त्याची परिणती लैंगिक विकृतीत (compulsive sexual behaviour) होईल का? हा खरा कळीचा मुद्दा आहे.
केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत २०१४ साली झालेल्या संशोधनातही मोठ्या प्रमाणात पॉर्न पाहणाऱ्या लोकांच्या मेंदूत काही बदल होतो असं आढळून आलं आहे. मात्र केवळ तेवढ्यावरून त्यांना पॉर्नचं व्यसन लागतं असं म्हणता येणार नाही, असं ते संशोधन करणाऱ्या व्हॅलरी वून (Valerie Voon) यांनी स्वतःच म्हटलं आहे. Compulsive sexual behaviour ही विकृती शंभरात चार जणांना असते. या विकृतीनं ग्रस्त असणाऱ्यांना आपले विचार, भावना किंवा आचार यावर नियंत्रण ठेवणं अशक्य होतं. मग त्यातून कधीकधी अनवस्था ओढवणारे प्रसंग उद्भवू शकतात. ही विकृती होण्याची अनेक कारणं आहेत. मोठ्या प्रमाणात पॉर्न पाहणं हे त्यांतलं एक कारण असू शकतं.
या स्पष्टीकरणामधुन तुमच्या प्रश्नाचे निराकरण झाले असावे.
संदर्भ : मेंदू आणि पॉर्न – सुबोध जावडेकर/ ऐसी अक्षरे / पॉर्न ओके प्लिज

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 3 =