प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsबाई गरम कशी करावी

1 उत्तर

मित्रा/मैत्रिणी,

या प्रश्नाचं उत्तर यापूर्वीदेखील दिलं आहे. परंतू पुन्हा या प्रश्नाचं उत्तर इथं लिहित आहोत. पहिल्यांदा प्रश्नातील शब्दांवर बोलू या. आपल्याकडं लैंगिकतेबद्दल ओपनली काहीच बोलायचं नाही, नाहीतर जे बोलायचं ते सर्व कोड लॅंग्वेजमध्ये बोलायचं असं चित्र आहे. अनेकवेळा या कोड लॅंग्वेजमधील शब्द लैंगिक कृतीबद्दल तुच्छता दर्शवतात. तेव्हा जिथे तुम्हाला असं दिसेल की तुच्छता दर्शक शब्द आहेत तिथे ते वापरणं टाळा. पर्यायी शब्द नक्की मिळतील.

आता वळू या तुमच्या प्रश्नाकडं. स्त्री जोडीदाराला उत्तेजित किंवा आकर्षित कसं करावं? हा तुमचा प्रश्न. खरतरं स्त्री किंवा पुरुषांना आकर्षित कसं करावं? याचा कोणताच फॉर्म्युला नाही. प्रत्येकजण आपापल्यापरीने इतरांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कृती करत असतो. कोणी आकर्षक कपडे घालून तर कोणी वागण्या-बोलण्याच्या शैलीतून इतरांना आकर्षित करत असतात इत्यादी. परंतू याचा असा अर्थ अजिबात होत नाही की सगळेजण एकमेकांना केवळ आकर्षित करीत असतात. स्वत:साठीदेखील माणसं नटतात, सजतात. यामध्ये स्त्रीला आकर्षित करण्यासाठी विशेष असं काही नसतं. कारण प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असू शकते. संभोगादरम्यान स्त्री-पुरुष एकमेकांच्या आवडी-निवडीच्या गोष्टी करतात ज्यामुळं त्यांना आनंद किंवा समाधान मिळतं.

आता तुमच्या प्रश्नातील पुरुषसत्ताकतेबद्दल बोलू या. जर तुम्ही कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीच्या मर्जीविरुध्द, इच्छेविरुध्द किंवा संमंतीशिवाय कोणतीही लैंगिक कृती करत असाल तर तो अपराध आहे. जसं अनेकवेळा पुरुष स्त्रीयांना उत्तेजित करण्यासाठी शिट्टी वाजवणं, त्यांच्या लैंगिक अवयवांकडं रोखून पाहणं, त्याबद्दल कमेंट पास करणं किंवा आपलं लिंग दाखवणं अशा कृती करतात. अशा कृती सार्वजनिक ठिकाणी केल्या जातात. आणि हे करण्याचं धाडस पुरुषांना लहानपणापासून मिळालेल्या अधिकारांमधून येतं. पुरुषांना असं वाटू लागतं की आपल्याविरुध्द स्त्रीया काहीच करु शकत नाही. त्या दुबळ्या आहेत. तुम्ही जर या गैरसमजामध्ये असाल तर लवकर बाहेर पडा.अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावचं लागेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 13 =