प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsबायकोने लिंग suck करने योग्य आहे का?

लिंग चोखणे योग्य आहे का? आणित्याचा फायदा काय आहे .

1 उत्तर

जोडीदारांनी एकमेकांच्या लैंगिक अवयवांना जिभेने चाटणे अथवा लिंग तोंडात घेणे याला मुखमैथुन असं म्हणतात. जर दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल, दोघांनाही त्यातून आनंद मिळत असेल तर त्यात गैर काही नाही. तसेच मुखमैथुन करताना योनीतून किंवा लिंगातून येणारा स्राव तोंडावाटे शरीरात गेला तरीही तो शरीरासाठी हानिकारक नसतो. मात्र मुखमैथुन करताना लैंगिक अवयव स्वच्छ असायला हवेत. लैंगिक अवयवांमध्ये जंतुसंसर्ग झाला असेल तर त्यावर उपाय करावा. अशा वेळी मुखमैथुन करू नये. काही जणांना मुखमैथुन करणे किळसवाणे वाटू शकते. त्यामुळे दोन्ही जोडीदारांना यातून आनंद मिळतोय का याचा विचार करणे आवश्यक आहे.

लैंगिक अवयवांना इतर मध, इतर खाद्य पदार्थ किंवा अति प्रमाणात सौंदर्यप्रसाधने लावणे यातून जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते.

याविषयीची अनेक प्रश्नोत्तरे वेबसाईट वर चर्चिली आहेत, ती नक्की वाचा.

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 1 =