प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमदनमणी,योनीभगोष्ट आणि मदनबिंदू म्हणजे काय? ते योनीत कुठे असतात?

1 उत्तर


स्त्रीच्या जननेंद्रियांमध्ये योनिचा समावेश होतो. योनिमार्गाचं दार, मूत्रद्वार किंवा लघवीची जागा, क्लिटोरिस अशा सर्व अवयवांची मिळून योनी बनते.
योनिच्या दोन्ही बाजूस त्वचा असते. त्याला बाह्य ओठ आणि आतले ओठ असं म्हणतात (ज्याला तुम्ही भगोष्ट म्हणत आहात). योनीच्या वरच्या बाजूला क्लिटोरिस/शिश्निका नावाचा छोटा पण अतिशय संवेदनशील असा अवयव असतो (ज्याला तुम्ही मदनमणी/ मदनबिंदू म्हणत आहात).. हा पूर्णपणे लैंगिक अवयव आहे आणि स्पर्शाला अतिशय संवेदनशील असतो. समागमामध्ये क्लिटोरिसला स्पर्श झाल्यास स्त्रीला सुख मिळते.
अधिक माहितीसाठी क्लिटोरिस नेमकं असतं कसं ? हा लेख वाचा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 10 =