प्रश्नोत्तरेमला वयाच्या 13 व्या वर्षपासून हस्तमैथुन करायची सवय होती जी एकही दिवस न चुकता 25 व्या वर्षापर्यंत मे केली पण आता सेक्स करायला जाताना माझं लिंग ताठर होत नाही तसेच लिंगावर खूप वळ्या पडल्यात. लिंग सेक्स करतानाच ताठर होत नाही बाकी वेळेला होते याच करण के असेल?

1 उत्तर

हस्तमैथुन आणि लिंग ताठ न होणे याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. हस्तमैथुनाविषयीचे अनेक गैरसमज आपल्या समाजात दिसून येतात. त्यातीलच हा एक. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुन करताना कोणत्या धातूच्या, काचेच्या टोकदार वस्तू वापरल्या तर मात्र लैंगिक अवयवांना इजा होऊ शकते. ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. खरंतर हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत.

हस्तमैथुनाविषयी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

हस्तमैथुनाविषयीचे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहेत ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आता आपण हे समजून घेऊया की पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू अशा वेळी रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टेरॉन या विशिष्ट सम्प्रेरकाचे प्रमाण ही कमी होत जाते ज्यामुळे लैंगिक उत्तेजनही कमी होत जाते आणि हे नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणताणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिछा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. लिंग शिथिलतेचा प्रश्न हा अनेक पुरुषांना भेडसावत असतो. जर यामुळे लैंगिक सुख अनुभवण्यास त्रास होत असेल तर त्याला आपण समस्या म्हणू शकतो यामुळे दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही असा त्रास होऊ शकतो होऊ शकतो. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. यासाठी सेक्सची सवय झाली की हळू हळू यावर ताबा येतो. रिलॅक्सेशन पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. सेक्स आणि संभोगाबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 17 =