प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमहिना झाला पाळी आली नाही काय करावलागेल पाळी येण्या साठी
1 उत्तर

प्रत्येक स्त्रीचं मासिक पाळी चक्र वेगवेगळं असतं. तुला नुकतीच पाळी येणं चालू झालं असेल तर सुरुवातीचे काही दिवस ती अनियमित असते हे माहित असावं. जर तू रजोनिवृत्तीच्या वयात असशील तरीदेखील पाळी अनियमित होवू शकते.

अनेकवेळा कामाच्या शारीरिक किंवा मानसिक ताण-तणावामुळे मासिक पाळी मागे-पुढे होवू शकते. परंतू ती एक-एक महिना मागे पुढे होणार नाही. गर्भधारणेची शक्यतादेखील असू शकते जर तू कोणासोबत संभोग केला असेल तर. फार काळजी करण्यापेक्षा लवकर डॉक्टरांना भेटावं. ते जास्त फायदेशीर राहील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 12 =