प्रश्नोत्तरेमाझं दोन मुलींवर प्रेम आहे पण मला एकी बरोबरच प्रेम करायचं आहे कोणावर करु कळत नाही दोन्ही मुली स्वभावान चांगल्या आहेत दोघी चांगल्या बोलतात माझ्या बरोबर काय करु सांगा कोणा एका वर प्रेम करु

1 उत्तर

एकीची निवड करण्याची घाई आहे का आणि असल्यास काय कारणामुळे ते दिलेले नाही. परिचय किती काळापासून आहे ते पहा. प्रेम आणि नाते संबंध यात फरक आहे. नाते सांभाळताना स्वभावातले सर्व कंगोरे माहीत होतात जे सगळे प्रेम (प्रकरण )करत असताना समोर येतातच असे नाही. स्वतःला आणि समोरच्याला सर्व वैशिष्ट्यासकट स्वीकारले तर नाते संबंध चांगले राहून टिकू शकतात. त्यासाठी खुला आणि प्रामाणिक संवाद साधावा लागतो. सध्याच्या परिचयाच्या काळात तुम्ही स्वतःला आणि दोघींना चांगले समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि सच्चेपणे संवाद साधायला शिका. दोघींनाही निवडीचे स्वातंत्र्य आहे हे लक्षात ठेवा आणि योग्य वेळेस संवाद करून निर्णय घ्या. तुम्हाला शुभेच्छा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 17 =