प्रश्नोत्तरेमाझं लग्न झालं नाही. मी सेक्स करू इच्छितो. एखाद्या स्त्रीला सेक्ससाठी कसं तयार करावं ?

1 उत्तर
  • सेक्सकडे काहीवेळा केवळ एक शारीरिक क्रिया म्हणून पाहिले जाते. तुमची गरज म्हणून सेक्ससाठी तुम्हाला स्त्री हवी आहे असे जर असेल तर त्यात असलेला धोका प्रथम समजून घ्या. स्त्रीकडे तुमची कामभावना शमविण्याची वस्तू म्हणून पाहणे हा एक अन्याय वाटत नाही का? स्त्रीला सेक्ससाठी “तयार” करण्याचे तुमचे जे काही मार्ग असतील ते तुम्ही एखाद्या स्त्रीवर वापरले आणि तिला ते मंजूर नसतील तर तो तिच्यावर ‘अत्याचार’ मानला जाऊ शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. राजेंद्रकुमार पचौरी या प्रसिद्ध शास्त्रज्ञाला या कारणास्तव एप्रिल २०१६ मध्ये घरी जावे लागले हे लक्षात ठेवा. केवळ शरीरसंबंध ज्यांना हवा आहे, असे लोक वेश्यांकडे जात असतात. त्यासाठी त्यांना लिंग संपर्कातून उद्भवणारे रोग होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.
  • ज्यांना जोडीदार नाही असे बरेच लोक लैंगिक गरज पूर्ण करण्यासाठी हस्तमैथुन करतात. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत.
  • तुमचे एखाद्या स्त्रीबरोबर मैत्री, प्रेम आणि आदर युक्त संबंध असतील तर त्यामध्ये स्वतःला आणि दुसऱ्या व्यक्तीला सर्वार्थाने स्वीकारले गेले असते. त्यात केवळ आवडी निवडी, आचार-विचार आणि रूढी-सवयी यांचा स्वीकार नसतो तर व्यक्ती म्हणून असलेल्या आशा आकांक्षा आणि भीती चिंता यांचा सुद्धा स्वीकार केलेला असतो. त्यातून जवळीक निर्माण झाली, त्याचा पुढचा नैसर्गिक टप्पा हा प्रेम व लैंगिक समागमात झाला तर त्यामध्ये परस्पर संमती, उभयतांचे समागमसुख आणि सुरक्षितता या गोष्टी पाळल्या जातात. याला लैंगिक संबंधातील नैतिकता असे समजणे आवश्यक आहे. ही नैतिकता लग्न झालेल्यांनाही तितकीच लागू आहे.
  • आधुनिक कामविज्ञानामध्ये समागमातील पूर्व क्रीडेला महत्त्व दिले आहे. त्यामुळे परस्परांचे उद्दीपन होते आणि समागम उभयतांना सुखकारक होऊ शकतो. पण हे सारे कोणासाठी? तर त्यात परस्पर संमती आणि सुरक्षितता गृहीत धरली आहे.

 

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 16 =