सर लास्ट time तुम्ही मला मनाला होता की मुलीशी बोलताना बिनदास्त बोल म्हणून ..परवा आमच्या मित्राच्या वाढदिवसाला त्याच्या घरी अमी सगळे मुलेमुली जमलो होतो .ग्रुप गेम खेळून आम्ही खूप मजा केली .आणि यावेळी काहीही वाटलं नाही हे विशेष.
त्यामुळे आधी तुमचे खूप खूप आभार …मना पासून थँक्स ….
ग्रेट. अभिनंदन. तुझ्या मनातील भीती हळूहळू कमी होत आहे हे ऐकून खूप बरं वाटलं. आता पटली का खात्री ? मनातील गैरसमज दूर केले की भीती/नकारात्मक भावना कुठल्या कुठं पळून जातात. मुलींशी बोलणं काही वाईट, चूक नाही. कोणत्याही नात्यामध्ये संमती, आदर, विश्वास महत्वाचा असतो. मग ते मैत्रीचं असो किंवा प्रेमाचं. आपण कोणाच्या मर्जीविरुद्ध काही करत नाही ना ? समोरच्या व्यक्तीचा अनादर करत नाही ना ? हे महत्वाचं.
आणखी काही प्रश्न असतील तर नक्की कळवत जा. काळजी घे.