प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या मैञीनीला 10तारखेला मासीक पाळी येते तर मी 1 तारखेला संभोग केला होता तर ते गरोधर राहु शकते का ? तिला नंतर मासीक पाळी आली नाही

माझ्या मैञीनीला 10तारखेला मासीक पाळी येते तर मी 1 तारखेला संभोग केला होता  तर ते गरोधर राहु शकते का ? तिला नंतर मासीक पाळी आली नाही

1 उत्तर

तुमच्या मैत्रिणीची पाळीची तारीख उलटून गेली असेल तर  सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत का हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा.
पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो.दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. प्रत्येकाच्या पाळीचक्रानुसार हा काळ वेगळा असू शकतो.  बऱ्याच जनांचा असा समाज असतो की अंडोत्सर्जन हे १४ व्या दिवशीच होतं. पण बहुतेक वेळा ते लवकर किंवा उशिराही होत असतं. लवकरात लवकर म्हणजे अगदी ७ व्या दिवशीही अंडोत्सर्जन  होऊ शकतं.
नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य ते  गर्भनिरोधक वापरणे  गरजेचे आहे. तसेच जोडीदाराबरोबर याविषयी चर्चा करून दोघांच्या संगनमताने कोणते गर्भनिरोधक वापरायचे हे ठरवले पाहिजे. शिवाय आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की,  लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे.   ‘नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी’ या वेबसाईटवरील लेखातून तुम्हाला अधिक  माहिती मिळेल.  खाली लिंक दिली आहे. https://letstalksexuality.com/contraception/

 

आवाहन

तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.

 

तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 2 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी