प्रश्नोत्तरेमाझी love marriage झाली आहे लगना 1वषॅ झालेत मी आठ महिन्यांनी गरोदर आहे पण मला हे मुल नको आहे काय करू

1 उत्तर

भारतामध्ये 20 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात कायदेशीर आहे. आईच्या जिवास धोका असल्यास, गर्भामध्ये गंभीर व्यंग असल्यास, बलात्कारातून गर्भ राहिला असल्यास किंवा गर्भनिरोधक निकामी ठरल्याने गर्भ राहिला असल्यास गर्भपात करण्यास परवानगी आहे. पहिल्या 12 आठवड्यात म्हणजेच गर्भधारणा झाल्यापासून पहिले तीन महिने गर्भपात सुरक्षित असतो. त्यामुळे गर्भपात करायचा असल्यात तसा निर्णय लवकर घेणं आणि शक्यतो पहिल्या तीन महिन्यात गर्भपात करून घेणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. 12 आठवडे उलटून गेले असतील तर दोन डॉक्टरांच्या संमतीने गर्भपात करून घेता येतो. गर्भपात नोंदणीकृत दवाखान्यामध्येच करून घ्यावा. गर्भपात करणारी डॉक्टर प्रशिक्षित आहे का याची माहिती करून घेणे आवश्यक असते. जिथे गर्भपात करणार तो दवाखाना, जागा साफ व निर्जंतुक आहे ना याची खात्री करणं आवश्यक आहे. 20 आठवड्यांनंतर गर्भपात कायदेशीर नाही. त्यामुळे जास्त वेळ न दवडता गर्भपाताचा निर्णय शक्यतो लवकर घेणे आवश्यक आहे.

आठ महिने म्हणजे जवळजवळ ३२ आठवडे म्हणजे बराच वेळ झाला आहे ? तुम्हाला गर्भपात का करायचा आहे ? काही अडचण आहे का? या काळात गर्भपात करणं सुरक्षित नसल्याने तुमच्या आरोग्यासाठी देखील ते घटक आहे. काही वैद्यकीय अडचण असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अधिक माहितीसाठी तुम्ही 9075 764 763 या मर्जी हेल्पलाईनला सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळामध्ये फोन करू शकता. या हेल्पलाईन विषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंक वरील लेख वाचा

https://letstalksexuality.com/helpline-abortion/

https://letstalksexuality.com/abortion/

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 12 =