आशा आहे तुम्ही वयाची सोळा वर्षे पूर्ण केली आहेत कारण ही वेबसाईट १६ वर्षे पुढील व्यक्तींसाठी आहे.
आता तुमचे उत्तर. तुम्हाला जी मुलं चिडवतात त्यांची तक्रार तुम्ही न घाबरता, संकोच न करता तत्काळ शाळेच्या जबाबदार आणि तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे अशा व्यक्तीकडे (शिक्षक किंवा मुख्याध्यापक) करा. यामुळे तुमचा त्रास कमी होईल. गप्प बसून, त्या मुलांशी भांडून किंवा मारामारी करून प्रश्न सुटणार नाही उलट तुम्हाला अधिक त्रास किंवा इजा होण्याचीच शक्यता आहे. ही बाब तुम्ही तुमच्या आईच्या कानावरही घालू शकता. शिवाय १०९८ ह्या मुलांसाठीच असलेल्या हेल्पलाईन (चाईल्ड लाईन) वर फोन करून तुम्ही बोलू शकता आणि मदत घेऊ शकता. तुम्ही जर लेंड लाईन वरून फोन केलात तर तुम्हाला पैसे ही पडणार नाहीत.
आईच्या इतर कोणाशी असलेल्या संबंधांवरून तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना समजू शकतो. तुम्हाला राग येत असेल किंवा वाईट वाटत असेल. पण तुम्ही या विषयी तुमच्या आईशी बोलला आहात काय? ह्या गोष्टीत किती तथ्य आहे हे तुमच्या आईला विचारलं आहे काय? जर नसेल तर तसे करा. आईशी संवाद करून तुम्हाला नक्की मदत होईल.
पण आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. लैंगिक इच्छा पूर्ती ही माणसाची अगदी सामान्य पण महत्वाची गरज आहे. प्रत्येक प्रौढ आणि सज्ञान व्यक्तीला आपले नातेसंबंध आणि लैंगिक जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. तसाच लैंगिक इच्छा व्यक्त करण्याचा आणि अनुभवण्याचाही अधिकार आहे. तुम्ही मोठे झाल्यानंतर तो तुमचासुद्धा अधिकार असणार आहे. त्यात पाप किंवा घाण किंवा अपवित्र असं काही नाही. आणि तुम्ही जेंव्हा आपला जोडीदार निवडाल तेव्हा तुमची आई कदाचित तुमच्यावर रागावणार नाही तर प्रेमच करेल…