प्रश्नोत्तरेमाझ्या बायको ने लग्ना आधी तीन चार मुलांच्या सोबत शरीर संबंध ठेवले होते , आणि आता मला ते माहीत झाले मी काय करायला पाहिजे ,

माझ्या बायको ने लग्ना आधी तीन चार मुलांच्या सोबत शरीर संबंध ठेवले होते , आणि आता मला ते माहीत झाले मी काय करायला पाहिजे , मी विचारले त तिने मला खर आहेमनुन सांगितले ,

1 उत्तर

सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आता वळू यात उत्तराकडे.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेकदा काही ना काही भूतकाळ असतोच. आपल्याकडे लग्नाआधीचे लैंगिक संबंध असणं हे स्वीकारणं जड जातं, हे खरं आहे. पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला जोडीदार म्हणून स्वीकारतो तेव्हा ती जशी आहे तशी स्वीकारणं अपेक्षित असतं. अगदी तिच्या भूतकाळासहित. नाहीतर मग अशाप्रकारचा भूतकाळच नसेल असं कुणीतरी शोधायला पाहिजे. पण अशी व्यक्ती खात्रीने भेटेलच असं नाही.

तुम्हा दोघांना या गोष्टीवर संवाद साधता आला तर अधिक चांगले होईल. त्यातून या निसर्गदत्त प्रेरणेचे उभयतांना निकट आणणारे, परस्परांना सुख देणारे आणि परस्परांचा मान राखणारे एक सुंदर रूप तुम्हाला अनुभवता येईल.

तिच्या लेखी शरीरसंबंधाला काय अर्थ होता आणि आहे हे पाहणे आवश्यक आहे. त्या साठी तुम्हाला ही तुम्ही सेक्सकडे कसे पाहता हे बघावे लागेल. तारुण्यसुलभ कुतूहल, थ्रिल, साहस या भावनेपोटी ते होऊ शकते. आपण पुरूषांना आकर्षित करु शकतो ही भावना देखील सुखावह ठरते. किंवा पुरुषापासून काही फायदा पदरात पाडून घेण्यासाठी सेक्सचा वापर केला जाऊ शकतो. तिने नेमके काय केले हे तिला समजणे आवश्यक आहे. या सर्वातून एक गोष्ट तुम्हाला कदाचित जाणवली असेल – ती म्हणजे तिला सेक्स आवडते आणि तिला त्याबद्दल संकोच वाटत नाही. यासाठी तिला अपराधी ठरविले जाऊ नये, कारण ही निसर्गाने दिलेली प्रेरणा आहे.

‘तिने मला आधी सांगायला पाहिजे होतं’ असंही कदाचित तुमच्या मनात येऊन गेलं असेल. कोणत्याही नात्यामध्ये पारदर्शकता असेल तर ते नात्यासाठी चांगलं असतं हे खरं आहे. पण आपल्याकडे अजून तरी लग्नाआधीचे लैंगिक संबंध स्वीकारले जात नाहीत त्यामुळे तुमच्या जोडीदाराला तुम्हाला मोकळेपणाने ते सांगता आलं नसेल. ‘तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना?’ ‘सध्याच्या नात्यावर काही परिणाम तर होणार नाही ना ?’ यांसारखे असंख्य प्रश्न तिच्या मनात येऊन गेले असतील.

तुम्ही काय करायला पाहिजे हे खरंतर हे तुमच्या आत्तापर्यंतच्या नात्यावर अवलंबून आहे. तुमच्या आत्तापर्यंतच्या चालत आलेल्या सहजीवनाच्या प्रवासात तुम्ही परस्परांसाठी पूरक असाल, आनंदी सहजीवन जगत असाल तर भूतकाळ स्वीकारून एकमेकांचा स्वीकार करणंच योग्य ठरेल. पण हा स्वीकार खऱ्या अर्थाने ‘स्वीकार’ असायला पाहिजे. यावरून जोडीदाराला कोसत राहू नका. एकमेकांशी मोकळेपणाने बोला आणि दोघे मिळून भविष्यातील सहजीवनाविषयी ठरवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 8 =