प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या मित्राने त्याचे लग्न झाले असताना सुद्धा दुसऱ्या लग्न झालेल्या मुलीबरोबर बिना निरोध चा सेक्स केला पण त्याच्या बायकोला आणि लग्न झालेल्या मुलीला एड्स नाही तर त्याला होऊ शकतो का उत्तर
1 उत्तर

जर तिघांपैकी कोणालाही एचआयव्हीची लागण झालेली नसेल तर लैंगिक संबंधातून एचआयव्हीची लागण होणं शक्य नाही. मात्र तरीही कंडोमचा वापर करणं फायदेशीर राहतं. मात्र तुमचा मित्र ज्या नात्यामध्ये आहे त्यात तो कोणाची फसवणूक तर करत नाही ना? याची त्याला कल्पना असावी. असे लैंगिक संबंध घटस्फोटासाठी कारणीभूत ठरू शकतात.

ज्या व्यक्तीला(स्त्री/पुरुष) एचआयव्हीची लागण झाली असेल त्या व्यक्तीसोबत केलेल्या असुरक्षित संबंधामुळं दुसर्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण होण्याचा धोका असतो. म्हणजेच एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते. शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो. लिंगसार्गिक आजार असतील तर एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो.

एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे

• निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया,

• दूषित रक्त आणि

• प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 14 =