प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ लवकरच गळत
1 उत्तर

तुमचा प्रश्न नेमका काय आहे हे कळत नाही. परंतू तुम्हाला संभोग करताना वीर्य लवकर बाहेर येत असं विचारायचा आहे हा अंदाज बांधून उत्तर लिहित आहोत.

संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. शीघ्रपतन कोणत्याही वयात होऊ शकते. ही अनेक पुरुषांमध्ये आढळणारी समस्या आहे आणि त्यावर निश्चितच उपाय करता येईल त्यामुळे निश्चिंत रहा. आपण आणखी एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की, संभोग हा लैंगिक समाधानाचा एकमेव मार्ग नाही. त्यामुळे तुम्ही प्रणयक्रीडा (fore play) करता यातूनही जोडीदाराला लैंगिक समाधान मिळू शकते. पण तुमच्या जोडीदाराला लैंगिक समाधान मिळते की नाही हे समजून घेण्यासाठी मनमोकळा संवाद हवा.

शीघ्रपतनाविषयी सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करून लेख वाचा.

https://letstalksexuality.com/premature-ejaculation/

तसेच

https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

या लिंक वरील लेखामध्ये लेखात शीघ्र वीर्यपतनावर एका तार्किक उपायाचा विचार केला गेला आहे, हा लेख नक्की वाचा. या उपायाचा फायदा होत नसेल तर योग्य त्या डॉक्टरांची अवश्य मदत घ्या.

I सोच replied 8 years ago

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/lets-soch-ek-naya-nazaria/

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 13 =