प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ वय २२ आहे. मला हस्तमैथुन करण्याची सवय लागली आहे. सुरवातीली बर वाटायच पण आता ञास व्हायला लागला आहे .दिवस भर मनात तेच विचार मनात चालत असतात. झोप नीट होत नाही, स्वप्न पण तशीच पडतात. हे अस गेली ८ वर्ष चाललय. मला तुम्हाला भेटायचे आहे.
1 उत्तर
Answer for sex answered 8 years ago

हस्तमैथुन करण्यामध्ये वाईट असं नक्कीच काही नाही. उलट हस्तमैथुनामुळं लैंगिक भावनांना वाट मोकळी करुन देता येते.

तुमच्या प्रश्नांवरुन असं लक्षात येत आहे की तुम्ही खूपच एकटे आहात. कदाचित काही गोष्टींचा ताण तुम्हाला असावा. एकटेपणा घालवण्यासाठी सतत लैंगिक गोष्टींचा विचार करुन हस्तमैथुन केलं जाऊ शकतं. अशावेळी एकटं बसणं किंवा राहणं यापेक्षा मित्र मैत्रिणींना भेटला तर जास्त फायदा होईल. त्यांच्याशी गप्पा मारा. कवितांची, कांदबर्‍यांची पुस्तकं वाचा. छंद जोपासा. अशामुळं तुमचं मन इतर कामांमध्ये गुंतेल आणि तुमचा एकटेपणा कमी होईल. एकटेपणा कमी झाला की आपोआप हस्तमैथुन सवयीपेक्षा आनंदासाठी केलं जाईल.

आम्हाला भेटण्यासाठी आमचा पत्ता वेबसाईटच्या खालील बाजूस दिला आहे.

I सोच replied 8 years ago

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/lets-soch-ek-naya-nazaria/

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 17 =