प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमासिक पाळी चे चार दिवस संपल्यावर मी 12व्या दिवशी संभोग केला आहे मंग गर्भ राहू शकतो का
1 उत्तर

मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संभोग केला तर गर्भ नक्कीच राहील असे शंभर टक्के सांगता येत नाही.  सर्वसाधारणपणे २८ दिवसांची नियमित मासिक पाळी असल्यास चौदाव्या दिवसाचा आसपास बीजांडकोषातून स्त्री बीज बाहेर पडते, जे २४ तासांपर्यंत जिवंत राहते असे मानले जाते. मासिक पाळीचा स्त्राव सुरु झाल्यापासून दहावा दिवस ते अठरावा दिवस (दोन्ही दिवस धरून) या काळात गर्भधारणा होण्याची शक्यता असते. मात्र मासिक पाळीचे चक्र नियमित असणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा आपण हे खात्रीने सांगू शकत नाही हे नक्की. अधिक माहितीसाठी आपल्या वेबसाईट वरील https://letstalksexuality.com/conception/ या लिंक वर क्लिक करा.
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.  
 
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल जरूर पाठवा.
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 12 =