प्रश्नोत्तरेमि एका दिवसात दोनदा सेकस करू शकत नाहि

1 उत्तर

म्हणजे नेमके काय होते हे सांगितले तर अधिक चांगले होईल. इच्छा होत नाही, लिंग ताठर होत नाही की आणखी काय?

समागम ही शारीरिक कमी आणि मानसिक कृती अधिक आहे. मनाच्या स्वास्थ्याचा समागम आणि सामागामच्या इच्छेशी अधिक जवळचा संबंध आहे.

स्त्री पुरुषांमध्ये जसजसे वय वाढत जाते तसतशी लैंगिक क्रियांमधील इच्छा कमी होत जाते. पुरुषांमध्ये लैंगिक इच्छेसाठी कारणीभूत असलेल्या हार्मोनचे (testestron) प्रमाण कमी होत जाते. ताणताणाव, कामाचा व्याप, औषधांचा परिणाम किंवा कंटाळा ही कारणं सेक्स मधील इच्छा कमी होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो.

निरोगी जीवनशैली, व्यायाम, आहारावर नियंत्र आणि तणावरहित नातेसंबंध असतील तर लैंगिक जीवन सक्रीय आणि तितकेच आनंददायी असू शकते.

तुम्हाला या गोष्टीचा मानसिक त्रास होत असेल तर तुम्ही एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणं चांगलं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 16 =