प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी तिला i-pill चि गोळि दिली, तर परत चार दिवसांनी सेक्स झाला. काय करू
1 उत्तर

तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं मासिक पाळी चक्र माहित असेल तर सुरक्षित काळ ओळखणं सोप्प जाईल. जसं मासिक पाळी ठराविक दिवसांनीच येत असेल तर पुढची तारीख येण्याच्या १२ ते १६ दिवस आगोदर अंडोत्सर्जन होत असतं. याला स्त्रीबीज म्हणतात. स्त्रीबीज १२ ते २४ तास जिवंत असतं. या काळात जर पुरुषाच्या शुक्राणूचा संपर्क आला तर गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते. जर या व्यतिरिक्तचा काळ असेल तर गर्भधारणा होण्याची शक्यता नसते. परंतू तुम्ही नुकतीच गर्भनिरोधनाची इमर्जन्सी गोळी घेतली आहे, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर राहील.

हे मात्र नेहमी लक्षात ठेवा…

स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजे जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात जर गर्भनिरोधक न वापरता जर लैंगिक संबंध केले असतील किंवा निरोध वापरूनही तो फाटला किंवा फेल गेला तर गर्भधारणेची शक्यता असते. अशा वेळी असे संबंध आल्यानंतर ७२ तासाच्या आत जर या गोळ्या घेतल्या तर गर्भधारणा रोखता येऊ शकते. यांना मॉर्निंग आफ्टर पिल्स असंही म्हणतात. मात्र यांच्या नावाप्रमाणे या इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापराव्यात. नियमित गर्भनिरोधक म्हणून याचा उपयोग करणं चांगलं नाही. बाजारामध्ये अनेक इतर कमी गर्भनिरोधके उपलब्ध आहेत त्यांचा वापर करावा. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/contraception/

I सोच replied 7 years ago

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/lets-soch-ek-naya-nazaria/

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 2 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी