प्रश्नोत्तरेमी एका मुलीशी सेक्स केला पण तिला मासीक पाळी होत नाही आहे . मी काय करू?या गोष्टीला एक हप्ता जास्त झाला.

1 उत्तर

स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजेच जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात जर गर्भनिरोधक न वापरता लैंगिक संबंध केले असतील किंवा निरोध वापरूनही तो फाटला किंवा फेल गेला तर गर्भधारणेची शक्यता असते. स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळ ओळखण्यासाठी  https://letstalksexuality.com/conception/  या लिंक वरील लेख नक्की वाचा. पाळीची तारीख उलटून जर आठवडा झाला असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. जोडीदाराचा आदर, संमती आणि सुरक्षा यांची काळजी घेऊन केलेले लैंगिक संबंध अधिक सुखकर आणि आनंददायी होऊ शकतात.
 
सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे गर्भधारणा तसेच इतर लिंग संसर्गित आजार टाळण्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे. नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भनिरोधके वापरावीत यासाठी  योग्य सल्ला घेणं गरजेचे आहे. तसेच जोडीदाराबरोबर याविषयी चर्चा करून दोघांच्या संगनमताने कोणते गर्भनिरोधक वापरायचे हे ठरवले पाहिजे. शिवाय आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे. ‘नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी’ या वेबसाईटवरील लेखातून तुम्हाला गर्भनिरोधकांविषयी माहिती मिळेल. लिंक https://letstalksexuality.com/contraception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 3 =