प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी तिच्या बरोबर सेक्स करू का ?

माझे तिच्याबरोबर गेले 1 वर्ष प्रेम आहे आम्ही दोघे फिरायला जातो तेव्हा kiss आणि इतर गोष्टी करतो पण ती आता 10 वी मध्ये आहे.
तिचे वय अजुन 18 पूर्ण नाही. पण तिची तब्येत चांगली आहे.
मी तिच्याबरोबर सेक्स केला तर काही प्रॉब्लेम नाही ना येणार ?
ती माझ्याबरोबर सेक्स करायला तयार आहे.

1 उत्तर

प्रिय मित्र,

तुमची मैत्रीण जरी सेक्ससाठी तयार असेल तरी तिची संमती कायद्यानुसार ग्राह्य धरली जात नाही. भारतामध्ये कायद्यानुसार १८ वर्षाच्या आतील व्यक्तीसोबत सेक्स करणे हा कायद्याने गुन्हा आहे. संमती देण्याचं किंवा लैंगिक संबंध म्हणजे काय, संमती म्हणजे काय, हे कळण्याचं हे वय नाही असे मानले जाते. त्यामुळे १८ वर्षाच्या आतील व्यक्तीसोबत जर कोणी लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्यांच्यावर बलात्काराचा आणि बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊ शकतो. स्वतःच्या लैंगिक सुखासाठी १८ वर्षाच्या आतील व्यक्तीच्या लैंगिक अवयवांना हात लावणे, लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. याशिवाय जर कोणी खोटी आश्वासने, लग्नाचे आमिष, भीती, दबाव आणून कोणत्याही स्त्रीसोबत लैंगिक संबंध ठेवत असेल तरीही तो कायद्याने बलात्कार मानला जातो.

याठिकाणी आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आज १८ वर्ष पूर्ण झाली म्हणजे उद्या लगेच लैंगिक संबंध किंवा सेक्स करायला हरकत नाही असंही नाही. समोरच्या व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक तयारी, आवश्यक ते लैंगिक ज्ञान, आदर, संमती, इच्छा याही गोष्टी महत्वाच्या आहेत. शिवाय नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य ते गर्भ निरोधक वापरणे गरजेचे आहे. तुमची मैत्रीण सज्ञान (१८ वर्षे पूर्ण) होईपर्यंत आणि तिची खऱ्या अर्थाने शारीरिक आणि मानसिक तयारी होईपर्यंत तुम्ही तुमचं भावनिक नातं आणखी घट्ट करू शकता, संवाद वाढवू शकता आणि तीला योग्य ते लैंगिक ज्ञान मिळावे यासाठी प्रयत्न करू शकता.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 0 =