Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

मी दर 1 महिन्यातून एका लग्न झालेल्या बाई बरोबर शरीर संबंध ठेवले आहेत विना कंडोम चे 5 वेळा झाले आहे असे तर काय होईल का मला त्रास मी कोणतीही तपासणी न करता

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
December 5, 2016

एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते.

एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे

निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया,

दूषित रक्त आणि

प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.

शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो. लिंगसार्गिक आजार असतील तर एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो.