मागील दोन महिन्यांपासून तुमची पाळी नियमीत येत असेल तर काळजी करण्याचं कारण नाही. जर पाळीची तारीख चुकली असेल तर बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या प्रेग्नन्सी किटचा वापर करुन घरच्या घरी गर्भधारणेची तपासणी करुन घेता येईल. किंवा जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाउन लवकरात लवकर तपासणी करुन खात्री करुन घ्या. योग्य कारणामुळं केलेला गर्भपात कायदेशीर आहे. त्यामुळं न घाबरता लवकर तपासणी करा. काही महत्वाचं: वयाच्या विविध टप्यांवर लैंगिक नाती तयार होत असतात. अशा नात्यांमध्ये सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतं. बाजारामध्ये अनेक गर्भनिरोधके उपलब्ध आहेत. कंडोम तर अगदी सर्वच मेडीकल स्टोअरमध्ये उपलब्ध असतात. जोडीदाराला ते वापरण्याची सूचना द्या. जोडीदाराने नकार दिला तर असुरक्षित लैंगिक संबंध टाळा.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा