प्रश्नोत्तरेमुलीचे सील कसे तोडायचे
अमोल पालये replied 2 years ago

932103xxxx

let's talk sexuality replied 2 years ago

या नंबर चं काय करावं हे कळलं नाही.

1 उत्तर

पहिल्यांदा तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही वापरलेल्या ‘सील तोडणे’ याविषयी बोलूयात. स्त्रीच्या योनीमार्गात हायमेन नावाचा लवचिक पडदा असतो. तो फाटला असेल तर ती मुलगी कुमारी किंवा व्हर्जिन नाही असा चुकीचा समज आहे. हा पडदा सेक्सशिवाय इतरही शारीरिक हालचाली – जसं पोहणं, सायकल चालवणं, खेळ यामुळे फाटू शकतो. त्यामुळे हायमेन फाटणे म्हणजे सेक्स हे गृहितकच चुकीचं आहे.

कोणत्याही व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवताना दोन्ही जोडीदारांची संमती, इच्छा अत्यंत महत्वाची आहे. एखाद्या व्यक्तीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, सुरक्षितता. म्हणजेच, नको असलेली गर्भधारणा आणि लिंगसांसर्गिक आजार (लैंगिक संबंधांतून पसणारे आजार) होऊ नयेत म्हणून कंडोमचा वापर. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 13 =